जळगाव (प्रतिनिधी) कॉंग्रेसचे युवानेते चंदन पाटील यांनी आज अखेर ठरल्या प्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात आपल्या अनेक समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे.
जी.एम. फाऊंडेशनच्या कार्यालयात आज दुपारी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत चंदन पाटील यांचा प्रवेश सोहळा झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ, शिरीष बयस, चंद्रशेखर अत्तरदे, सुभाषअण्णा पाटील, संजय महाजन, जिजाबराव पाटील, माधुरी अत्तरदे, गुलाब मराठे,कन्हेय्या रायपूरकर, ललित येवले, कडू बयस, सचिन पाटील,टोनी महाजन, शरद भोई,वसंतराव भोलाणे, दिनेश पाटील, सचिन पानपाटील हे उपस्थित होते.
तर आज चंदन पाटील यांच्यासोबत शहरासह ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील, भवरखेडा येथील विकास सोसायटीचे संचालक निलेश पाटील, अमोल माळी, भागवत मराठे, ज्ञानेश्वर पाटील, सागर पाटील, भाऊसाहेब पाटील, भूषण पाटील, अशोक पाटील, रमण धनगर, परेश जाधव, ईश्वर चौधरी, दीपक चौधरी, मनोहर पाटील, भावेश पाटील, हेमंत पाटील, कुणाल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
भाजपला युवा ताकद मिळाली : गिरीश महाजन
चंदन पाटील यांच्या प्रवेशावर ना. गिरीश महाजन यांनी चंदन पाटील यांच्या निमित्ताने जळगाव ग्रामीणमध्ये भाजपला युवा ताकद मिळाली असल्याचे सांगितले. तसेच धरणगाव तालुक्यात थोडी फार राहिलेली कॉंग्रेस देखील संपुष्टात आल्याचे सांगितले.