नागपूर (वृत्तसंस्था) हे सरकारी ऑफिस आहे कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरत आहे. ही खासगी मालमत्ता आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya)नोटीस बजावण्यात आल्याबाबत आपला संताप व्यक्त केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नगरविकास खात्यात जाऊन काही फायली तपसाल्या होत्या. या फायली चेक करत असल्याचा किरीट सोमय्यांचा फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर सोमय्या यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच नगर विकास खात्यातील (urban development office) अधिकाऱ्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. पत्रकारांसोबत बोलतांना फडणवीस म्हणाले की, या सरकारचं डोकं फिरलं आहे. अण्णा हजारे यांच्या संघर्षानंतर माहितीचा अधिकार प्राप्त झाला. त्यामुळे कोणत्याही ऑफिसात जाऊन इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार सामान्य माणसाला मिळाला आहे. तोच अधिकार किरीट सोमय्यांनी बजावला. कागदपत्रे तपासताना ऑफिसमधील खुर्चीवर बसण्याचाही अधिकार आहे. हे सरकारी ऑफिस आहे. कुणाच्या बापाच्या मालकीचं ऑफिस नाहीये. मी जाणीवपूर्वक बापाच्या मालकीचं ऑफिस नाहीये, असा शब्द वापरत आहे. कारण ही खासगी मालमत्ता आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांना कोणत्या अधिकारात नोटीस बजावली याचा खुलासा करा, असं आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिलं आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नगर विकास खात्यात जाऊन काही फायली चेक केल्या. अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फायली चेक करत असल्याचा सोमय्यांचा फोटोही व्हायरल झाला होता. त्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे.