TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रत्येक वेळेस मीच बोलण्याचा ठेका घेतला नाहीय ; राऊतांचा महाविकासाआघाडीला घरचा आहेर

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी या पंतप्रधांनी केलेल्या या आरोपांबद्दल सरकारमधील लोकांनी बोललं पाहिजे, मी काही त्यांच्यावतीने बोलण्याचा ठेका घेतलेला नाही असं म्हणत राऊत यांनी माहाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय.

“मी महाराष्ट्र अभिमानी आहे. मी महाराष्ट्राचा नेता आहे. ही महामारी आहे. या महामारीचा उगम चीनमधून झालाय. मात्र यासंदर्भात पंतप्रधानांनी महाराष्ट्रावर केलेली टीका ऐकून मला वाईट वाटलंय,” असं राऊत आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले. पुढे बोलताना राऊत यांनी, “जागतिक आरोग्य संघटनेनं त्यात तथ्य मांडलंय. महाराष्ट्रासारख्या राज्यावर खापर फोडणं चुकीचं. जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नचं कौतुक केलंय. महाराष्ट्रातील सरकार, मुंबई महापालिका कसं काम करतेय याचं दाखले, आदर्श सर्वोच्च न्यायालयाने इतर राज्यांना दिलेत,” अशी आठवणही पंतप्रधान मोदींना करुन दिलीय.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

डॉक्टर, नर्स, पारिचारिकांनी मरण पत्कारणाऱ्यांचा सुद्धा अपमान

“जागतिक आरोग्य संघटनेनं केलेलं कौतुक, न्यायालयाने दिलेले दाखले या सर्व गोष्टींचा विचार न करता महाराष्ट्र आणि मुंबईमुळे ही महामारी पसरली असं सांगणं हे महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनतेचा लोकनियुक्त सरकारने केलेला अपमान आहे,” असं राऊत म्हणालेत. “ज्या डॉक्टर, नर्स, पारिचारिकांनी मरण पत्कारणाऱ्यांचा सुद्धा अपमान आहे. भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी पुढं येऊन यावर बोलायला हवं. एक महाराष्ट्राचे नेते म्हणून बोलायला हवं,” असं राऊत म्हणालेत. “मतभेद एका बाजूला आहेत. पण ठपका ठेवण्याचा जो प्रयत्न झाला. चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन प्रयत्न करण्यात आला,” असंही राऊत म्हणालेत.

तीच आमची भूमिका होती

“सोनू सूद कोणाचे कोण होते? त्यांना राजभवानात कोणी नेलं?, त्यांना राज्यपालांच्या हस्ते सोनू सूदचा सत्कार करणारे कोण होते? त्यांचं कौतुक कोण करत होतं?, लोकांना महाराष्ट्राबाहेर पाठवणारं कोण होतं? (सोनू सूद प्रकरणात) आम्ही म्हणत होतो की थांबा घाई करु नका, तीच आमची भूमिका होती,” असंही राऊत म्हणाले.

प्रत्येक वेळेस मीच बोलण्याचा ठेका घेतलेला नाही. ते काय करतायत?

“यासंदर्भात सविस्तर प्रतिक्रिया राज्य सरकारतर्फेच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडायला हवी. मी माझ्या पुरतं माझं एक मत मांडलं. सरकारमध्ये जे बसलेले आहेत त्यांनी बोलायला हवं. प्रत्येक वेळेस मीच बोलण्याचा ठेका घेतलेला नाही. ते काय करतायत? सरकार म्हणून त्यांची पण काही भूमिका आहे की नाही बोलण्याची, सांगण्याची. त्यांनी बोलावं ना! हा सरकारवर ठपका आहे,” असं म्हणत राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारने गप्प बसू नये असं मत नोंदवलंय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #SanjayRaut

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

डाॅ. नितीन पाटील यांची राष्ट्रवादी डॉ सेलच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औंरगाबादमध्ये गुन्हा दाखल !

May 3, 2022

काय सांगता…शिवसेनेचे माजी आमदार झाले चक्क ग्रामपंचायत सदस्य !

December 17, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार ८ एप्रिल २०२३ !

April 8, 2023

पोलिसाच्या घरात घुसून मोबाईल चोरी ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल !

September 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group