भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील मिरगव्हाण येथील गट नं. ९ मधील क्षेत्र १ ते १४ आर मधील ३९०० चो.मी.जागेचा अनधिकृत बिनशेती वापर सुरु असल्याबाबत ८२ हजार २९० रुपयांच्या दंडात्मक कारवाई का कारण्यात येवू नये याबाबतची नोटीस प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी काढली आहे.
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियन १९६६ ची कलम ४४ नुसार सक्षम अधिकार्याची परवानगी न घेता आपण अनधिकृत बिनशेती प्रयोजनासाठी बिनशेती वापर सुरु केला आहे. याबाबतचा प्रस्ताव १४ जानेवारी रोजी प्रशासनाला सादर केला आहे. त्यामुळे आपण ८२ हजार २९० रुपयांच्या दंडात्मक कारवाईस पात्र असल्याबाबतची नोटीस प्राताधिकारी रामसिंग सुलाने यांनी काढली आहे.
मंडळ अधिकारी कुर्हे यांच्या पंचनाम्यानुसार तहसीलदार यांनी ३९०० चौ.मी. अनधिकृत अकृषिक वापर दर्शविला आहे. या अहवालानुसार ८२ हजार २९० रुपयांचा दंड का वसुल करण्यात येवू नये? याबाबत दहा दिवसात लेखी खुलासा सादर करण्याबाबत कांताबाई बियाणी यांच्या नावे नोटीस काढण्यात आली आहे. याबाबत येथील माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानुसार प्रशासनाने ही कारवाई करत नोटीस काढण्यात आली आहे.