भुसावळ (प्रतिनिधी) अनधिकृत बांधकाम थांबविण्याबाबत तालुक्यातील खडके येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच बांधकाम चालू ठेवल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल.
खडके ग्रा. पं. हद्दीतील १९/१/१/१९/१अ/१ब/१ अवन कॉलनीमध्ये ग्रामपंचायत खडके यांच्या मालकीच्या ओपन स्पेसमध्ये मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या कब्जा करून अवैध बांधकाम केले आहे. तरी या नोटीसी द्वारे सूचित करण्यात येते की, सदर बांधकाम त्वरित बंद करण्यात यावे तसेच सदर परिसर स्वखर्चाने मोकळा करावा, सदर बांधकाम चालू ठेवल्यास आपल्या विरुद्ध मुंबई ग्रा. पं. अधिनियम १९५८ मधील तरतुदीनुसार फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे सदर कामे लागणारा खर्च ही आपण काढून वसूल करण्यात येईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.