जळगाव (प्रतिनिधी) दुकानावर नाश्ता घेण्यासाठी गेलेल्या महिलेला अश्लील भाषेत बोलून विनयभंग करत त्यांनी पैसे घेतल्याचे समाजात बदनामी केल्याची घटना शहरातील एका भागात घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एका परिसरातील ४२ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता महिला ही नाश्ता घेण्यासाठी सिंधी कॉलनीतील संतोषी माता मंदिराजवळील एसएसजी केटरिंग या दुकानावर गेल्या. त्यावेळी दुकानातील बबला नारायणदास तलरेजा (रा. सिंधी कॉलनी) याने महिलेला लज्जा उत्पन्न होईल, अशी अश्लील भाषा वापरून तिचा विनयभंग केला. तसेच पैसे घेतल्याचे सांगून समाजात बदनामी केली.
याप्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी बबला नारायणदास तलरेजा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.