जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली व उत्तराखंड राज्यातून जिल्ह्यात येणा-या नागरिकांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्गमित केले आहे.
तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजित राऊत यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ भारतीय साथरोग अधिनियम, १८८७ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली व एनसीआर दिल्ली व उत्तराखंड या संवेदनशील राज्यातून जळगाव जिल्हयात रेल्वेद्वारे येणा-या प्रवाशांची कोविड-१९ सदृष्य लक्षणांची तपासणी/चाचणी करण्याबाबत व आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याकामी रेल्वे विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस विभाग, राज्य परिवहन विभाग व आरोग्य विभाग यांना खालील प्रमाणे सुचना निर्गमित करण्यात येत आहेत.
1) केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली एनसीआर दिल्ली व उत्तराखंड या संवेदनशील राज्यातून जळगाव जिल्हयातील जळगाव, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, रावेर या रेल्वे स्थानकावर उतरणा-या सर्व प्रवाशांची दैनंदिन माहिती ४ तासापूर्वी रेल्वे विभागाने नियुक्त केलेल्या युवराज पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, भुसावळ नोडल अधिकारी यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव यांना scy.jalgaon@gmail.com या ईमेल वर पुरवावी.
2) वर नमूद राज्यातून जळगांव जिल्हयातील जळगाव, भुसावळ, पाचोरा, चाळीसगांव, धरणगाव, अमळनेर, रावेर या रेल्वे स्थानकावर उतरणा-या सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रिनींग व Rapid Antigen Test (RAT) करण्यासाठी जळगाव मनपा क्षेत्रात आरोग्य अधिकारी मनपा यांनी व तालुक्याच्या ठिकाणी संबंधित मुख्याधिकारी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेशी समन्वय साधून संबंधित रेल्वे स्थानकावर 24×7 एका स्वतंत्र कक्षाची स्थापना करावी.
3) अशा प्रकारे स्थापन करण्यात आलेल्या कक्षातील अधिकारी / कर्मचारी यांनी संबंधित स्टेशन मास्तर यांचे सहकार्याने रेल्वे विभागामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकारी यांचेशी संपर्क साधून वर नमूद संवेदनशील राज्यातून येणा-या प्रवाशांची माहितीची व त्यापैकी किती प्रवासी Rapid Antigen Test (RAT) मध्ये बाधित झाल्याचे आढळून आलेत याबाबतची नोंद एका स्वतंत्र नोंदवही मध्ये घ्यावी.
4) वर नमूद स्थापन केलेल्या कक्षास स्टॅम्पींग, वैद्यकीय उपकरणे व टेस्टींग सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित आरोग्य विभागाची राहील व सदर कक्षात गृह विलगीकरण, संस्थात्मक विलगीकरण करणे इत्यादी कामे करण्यासाठी कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची जबाबदारी संबंधित आयुक्त, जळगाव मनपा / संबंधित मुख्याधिकारी यांची राहील.
5) तद्नंतर आयुक्त, जळगाव मनपा / संबंधित मुख्याधिकारी यांनी Rapid Antigen Test (RAT) मध्ये पॉझिटीव्ह आढळून आलेल्या प्रवाशांना जवळच्या कोविड केअर सेंटरला १४ दिवस अलगीकरण करावे.
6) तसेच या कार्यालयाकडील परिपत्रक क्र. दंडप्र. 01/कावि/2021/604 दि. १२ मार्च, २०२१ अन्वये गृह विलगीकरण/ संस्थात्मक विलगीकरण करण्याची कार्यवाही करावी. तसेच Rapid Antigen Test (RAT) चा Negative रिपोर्ट असलेल्या प्रवाशांना १४ दिवस Home Quarantine असे Stamping करण्यात यावे व अस प्रवाशी विरोध करण्याची शक्यता असल्याने संबंधित रेल्वे पोलीसांनी याकामी सहकार्य करावे.
7) वर नमूद संवेदनशील राज्यातून संबंधित रेल्वे स्थानकावर मोठया प्रमाणात प्रवासी येणार असल्यास अथवा मोठया प्रमाणात प्रवासी पॉझिटीव्ह आढळून आल्यास अशा वेळेस सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याकरीता संबंधित पोलीस विभागाचे सहकार्य घेऊन संबंधित आगार प्रमुख, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचेशी समन्वय साधून रा.प बसेस मार्फत संबंधित प्रवाशांना कोविड केअर सेंटर संदर्भित करण्याची कार्यवाही करावी.
8) सदर ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या कक्षास हँड ग्लोव्हज, सॅनिटाईजर, थर्मल गन व इतर अनुषंगिक साहित्य पुरविण्याची जबाबदारी आयुक्त, जळगाव मनपा / संबंधित मुख्याधिकारी यांची राहील.
9) आयुक्त जळगाव मनपा / संबंधित मुख्याधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या नियमावलीनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता, मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा या पत्रात देण्यात आला आहे.