सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) राणे कुटुंबीयांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता भाजप नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा सगळीकडे खळबळ उडालेली पहायला मिळत आहे.
काल भाजप आमदार नितेश राणे यांच्या सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. जमाव केल्याप्रकरणी आणि पोलिसांशी हुज्जत, शांततेचा भंग केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत. व्हिडीओ शूटिंग पाहून अन्य जणांवर ही गुन्हे दाखल केले जाणर आहेत. जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त जमाव केल्याप्रकरणी आणि जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांशी हुज्जत घातली सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हे दाखल करण्यात आलेत.