भुसावळ (प्रतिनिधी) पोस्टाच्या पेमेंट बँकेत तुमचे खाते असेल आणि तुम्हाला इतर कोणत्याही बँकेतून पैसे हवे असतील, तर पोस्ट तुमच्यापर्यंत ते पैसे पोहोचवणार आहेत. बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी पोस्ट विभागाने हा निर्णय घेतला असून पोस्टाद्वारे बँक खात्यातील पैसे घरपोच मिळणार आहेत. भुसावळ विभागात आतापर्यंत एकूण ५२ हजार ७०७ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पेमेंट बँक खाते आणि बँकेच्या खात्याला आधार आणि मोबाइल क्रमांक लिंक असल्यास जवळच्या पोस्ट कार्यालयात संपर्क साधून या योजनेचा लाभ घेणे शक्य आहे. तुम्ही योजनेसाठी अर्ज दिल्यानंतर पुढील काही दिवसात पैसे घरपोच मिळू शकतील.
तालुकानिहाय आकडेवारी
तालुक्याचे नाव व्यवहार रक्कम
भुसावळ – 9,9183,32,46,616
बोदवड – 3,484 1,18,93,330
मुक्ताईनगर – 3,788 1,48,49,725
जामनेर – 6,2411,98,15,825
रावेर – 6,417 2,29,52,561
यावल – 7,8562,41,56,045
चोपडा – 15,003 16,45,44,781
लॉकडाउनचा कालावधी आणखी १५ दिवसांसाठी (३० एप्रिलपर्यंत) वाढवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना रोख रकमेची आवश्यकता भासू शकते. एटीएमवरही भार येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बँकांमध्ये गर्दी वाढू शकते. याकरिता पोस्ट विभागाने एक उपाययोजना आखली आहे. एखाद्या व्यक्तीचे कोणत्याही बँकेत आणि पोस्टात खाते असल्यास त्या व्यक्तीला पैशांसाठी बँकेत जाऊन रांग लावण्याची गरज नाही. पोस्टाशी संपर्क साधल्यास पेमेंट बँकेद्वारे तुमच्या घरापर्यंत पोस्टाचा कर्मचारी पैसे घेऊन दाखल होणार आहे.
‘अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना पेमेंट बँक योजनेचा फायदा होत असून, आतापर्यंत महाराष्ट्रातील पोस्टाच्या शेकडो ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन घरपोच पैसे स्वीकारले आहेत,’ अशी माहिती पोस्ट विभागाकडून देण्यात आली आहे. ‘पोस्टाच्या ग्राहकांनी विनाकारण बँकांमध्ये गर्दी न करता या योजनेचा लाभ घेत पैसे काढावेत,’ असे आवाहनही विभागातर्फे करण्यात आले आहे.