नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जीवाला धोका असल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलीय. जैशच्या दहशतवाद्याच्या चौकशीतून, सरदार पटेल भवन आणि राजधानी दिल्लीतील अन्य महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर एनएसए अजित डोवाल यांचे कार्यालय आणि घराभोवती सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलीय. जैश ए मोहम्मद संबंधित अटक करण्यात आलेल्या एका दहशतवाद्यानं पाकिस्तानी हॅन्डलरच्या सांगण्यावरून आपण अजित डोवाल यांच्या कार्यालयाची रेकी केल्याचं कबूल केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. डोवाल यांच्या कार्यालयाशिवाय श्रीनगरमधील इतरही काही भागांचं व्हिडिओ चित्रीकरण मलिककडे सापडलं होतं. हे व्हिडिओ त्याने पाकिस्तानमध्ये धाडले होते, असंही सांगण्यात येतंय यानंतर सुरक्षा एजन्सी अलर्ट झाल्या आहेत. यासंबंधी एक एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. जम्मूच्या गंग्याल पोलीस स्टेशनमध्ये मलिकविरोधात यूएपीएच्या कलम १८ आणि २० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलिक हा जैशच्या ‘लष्कर ए मुस्तफा’ या ग्रुपचा प्रमुख असल्याचं सांगितलं जातंय. त्याला अनंतनागमधून हत्यारं आणि स्फोटकांसहीत अटक करण्यात आली होती. जमात ए इस्लामी ही संघटना लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन या इतर दशतवादी संघटनांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी गृह मंत्रालयाला दिलीय.
एनएसए डोवाल यांना जीवाला धोक आहे. त्या बद्दल सुरक्षा यंत्रणा आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला सूचित करण्यात आले आहे असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले. हिदायत-उल्लाह मलिक शोपियनचा रहिवाशी आहे. त्याला सहा फेब्रुवारीला अटक करण्यात आली. जम्मूच्या गानग्याल पोलीस ठाण्यात मलिक विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. जैशच्याच लष्कर-ए-मुस्तफाचा तो प्रमुख आहे. त्याला अनंतनागमधून अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे शस्त्रास्त्र आणि दारुगोळयाचा साठा सापडला होता.