नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नथालापती व्यंकट उर्फ एनव्ही रमणा यांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना राष्ट्रपती भवन येथे सकाळी ११ वाजता सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. या प्रसंगी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यासोबत सर्वोच्च न्यायालयातील अनेक न्यायमूर्ती उपस्थित होते. माजी सरन्यायाधीश शरद बोबडे हे २३ एप्रिलला निवृत्त झाले आहेत.
सरन्यायाधीस एनव्ही रमणा यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबतच उपराष्ट्रपती वंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कायदामंत्री रविशंकर प्रसाद उपस्थित होते. रमणा २०२२ मध्ये सेवानीवृत्त होणार आहेत. त्यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत असेल. रमणा हे २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर रुजू होण्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.
देशाचे 48 वे सरन्यायाधीश रमणा कोण आहेत ?
न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा हे सरन्यायधीश शरद बोबडे यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील कोर्टातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. नुथुलापटी वेंकट रमणा यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी झाला होता. रमणा हे आंध्र प्रदेशातील शेतकरी कुटुंबातील आहेत. जून २००० मध्ये त्यांची आंध्र प्रदेशच्या हायकोर्टात कायमस्वरुपी न्यायमूर्ती म्हणून निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केले. सुप्रीम कोर्टात २०१४ पासून ते कार्यरत आहेत. सरन्यायाधीश रमणा यांनी १० फेब्रुवारी १९८३ मध्ये वकिलीचे काम सुरु केले. चंद्रबाबू नायडू यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी आंध्र प्रदेश सरकारचे अॅडिशनल अॅडव्होकेट जनरल म्हणूनसुद्धा काम पाहिलेले आहे. ते विज्ञान आणि कायद्याचे पदवीधर आहेत.