पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका म्हसवे गावात व पोलीस स्थानकाच्या बाहेरील सार्वजनिक जागी अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघां विरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील म्हसवे या गावी व पारोळा पोलीस स्थानकाच्या बाहेरील सार्वजनिक जागी संशयित आरोपी रजनीकांत गणपत पवार, किरण सदशिव महाले, लक्ष्मण उत्तम मोरे (सर्व रा.म्हसवे ता.पारोळा) हे एकमेकाशी करीत मोठ मोठ्याने अश्लील शिवीगाळ करून सार्वजनिक जागी शांततेचा भंग केल्याप्रकरणी पारोळा पोलिसात पो.कॉ.राहुल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुधीर चौधरी हे करीत आहेत.