पहूर (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात सुनिल भारत म्हस्के (वाकडी ता. जामनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. ८ एप्रिल २०२२ रोजी जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी २१ वर्षीय तरुणी तिच्या घरासमोर धुणी व भांडी काम करीत असतांना गावातील राहणारा सुनिल भारत म्हस्के हा तरुणीकडे एकटक अश्लिल नजरेने पाहुन डोळा मारुन हाताने ईकडे ये असे इशारे केले. तसेच यापुर्वी देखील तरुणी शौचास गेली की, तिचा पाठलाग करून आवाज देवुन तिच्या मनास लज्जा उत्पंन्न होईल असे कृत्यु करुन हातव्दारे इशारे केले होते. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात सुनिल भारत म्हस्के याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चडे करीत आहेत.