सावदा ता. रावेर (प्रतिनिधी) आक्षेपार्ह लिखाण करीत भावना दुखावणार्या समर्थ अॅकेडमीचे शिक्षक दीपकराज पाटील यांच्याविरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा सावदा पोलिसात दाखल करण्यात आला.
दीपकराज पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर यांना उद्देशून इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह लिखाण केले होते. त्याबाबत तक्रारदार व त्यांच्या साथीदारांनी याबाबत विचारणा केल्यानंतर संशयित शिक्षकांनी पुन्हा आक्षेपार्ह जातीवाचक विधान करीत भावना दुखावल्या. याप्रकरणी श्रीकांत उर्फ नाना पुंडलिक संन्यास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दीपकराज पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे करीत आहेत.