बोदवड (प्रतिनिधी) व्हाट्सअॅप गृपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हमीद हुसेन मुलतानी (वय २०), असे संशयिताचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
दि. ३० रोजी रात्री ९ वाजता हमीद याने आक्षेपार्ह शब्द, चिन्हाचे स्क्रिनशॉट, आक्षेपार्ह फोटोचे स्क्रिनशॉट, शब्द व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारीत केले. याप्रकरणी हमीदविरुद्ध बोदवड पो.स्टे भाग ५ नं.१८७/२०२३ भा.द.वि कलम १५३,१५३ (अ), २९५(अ) प्रमाणे पो.ना. शशिकांत शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सायंकाळी पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि.राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाने स.पो.नि. अंकुश जाधव ,पोहेकॉ संतोष चौधरी हे करीत आहेत.