TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंजाबात ५० गोळ्या झाडून बहिणीसह दोन भावांचा खून ; टोळी एके-४७ रायफल रोखून जेरबंद !

छत्रपती संभाजीनगर पोलिसांची धाडसी कारवाई, समृद्धी महामार्गावरील थरार !

vijay waghmare by vijay waghmare
September 8, 2024
in गुन्हे, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) पंजाबातील फिरोजपूर येथील गुरुद्वाराजवळ चार दिवसांपूर्वी अंदाधुंद गोळीबार करत तब्बल ५० राऊंड फायर करून बहिणीसह दोन भावांची निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. यातील सहा आरोपींना शनिवारी (दि. ७) पहाटे ५ वाजता छत्रपती संभाजीनगरजवळ समृद्धी महामार्गावरील कोलठाणवाडी बोगद्यात पोलिसांनी एके-४७ रायफल रोखून जेरबंद केले.

अक्षयकुमार ऊर्फ बच्छा बलबीरसिंग (२१), दिलेरसिंग मनिंदर चिवनसिंग (२२), सुखचैनसिंग गब्बरसिंग जास (२०), रवींद्रसिंग कर्नेलसिंग सुख (२१, सर्व रा. भानसी गेटजवळ, खालसा कॉलनी, फिरोजपूर), गुरुप्रीत दर्शनसिंग गोपी (२५, रा. पिंडचोला साहिब, जि. तरणतारण), प्रिन्स काका संधू (१८, रा. कुंडेपिंड हुसेनीवाला, बॉर्डर रोड, फिरोजपूर, सर्व रा. पंजाब) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फिरोजपूर शहरातील गुरुद्वाराजवळ ३ सप्टेंबर रोजी एका कारवर ९ जणांनी दिवसाढवळ्या बेधुंद गोळीबार केला होता. यात दिलीपसिंग (३२) आणि आकाशदीप सिंग हे जसप्रीत कौर (२२) हे भाऊ-बहीण जागीच ठार झाले होते. यातील मृत जसप्रीत कौरचे लग्न अवघ्या दहा दिवसांवर आले होते. घरात लग्नाची तयारी सुरू होती व नवरी मुलगी भावंडांसह खरेदीसाठी घराबाहेर पडली होती. आरोपींनी त्यांची कार वाटेतच अडवून या तिघांवर बेछूट गोळ्यांचा अक्षरशः पाऊस पाडला. मृतांच्या अंगावर आरोपींनी झाडलेल्या जवळपास ५० गोळयांच्या खुणा आढळल्या होत्या.

READ ALSO

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

या थरारक घटनेनंतर आरोपी पंजाबमधून फरार झाले होते. हे शस्त्रसज्ज आरोपी ठिकाण बदलत नदिडमध्ये दाखल झाले होते. दरम्यान, पंजाब पोलीस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक प्रमोद बान व अॅन्टी गैंगस्टर टास्क फोर्सच्या प्रमुखांना खुनातील आरोपी महाराष्ट्रात आल्याची माहिती मिळाली. शनिवारी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास प्रमोद बान यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना ही माहिती दिली. त्याआधारे त्यांनी माहिती घेत असता वरील प्रकरणातील सहा आरोपी नदिडहून भाड्याची इनोव्हा कार (एमएच २६ एसी ५५९९) घेऊन समृद्धी महामागनि मुंबईच्या दिशेने जात असल्याचे व तासाभरात ते छत्रपती संभाजीनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांना माहिती देऊन जलद प्रतिसाद पथकासह गुन्हे शाखेची टीम समृद्धी महामार्गाकडे रवाना केली.

बोगद्यात असे राबवले ऑपरेशन
ऑपरेशनमध्ये निरीक्षक संदीप गुरमे यांनी अत्यंत धाडसी योजना आखली. त्यांनी जलद प्रतिसाद पथकासह १० अधिकारी, ४० पोलीस कर्मचारी यांना ऑपरेशनची माहिती दिली. बुलेटप्रूफ जॅकेट, अत्याधुनिक शस्त्र घेऊन पोलीस पथक समृद्धी महामार्गावरील कोलठाणवाडी बोगद्याच्या दिशेने रवाना झाले. पहाटे पाच वाजेच्या सुमारास बोगद्याजवळ सापळा रचून थांबलेले होते. याचवेळी आरोपी कारमध्ये एका पंपावर डिझेल भरून समृद्धी महामार्गावरून पुन्हा मुंबईकडे निघाले. हीच संधी साधत पोलिसांनी समोरील बोगद्यात त्यांना अपघाताचा बनाव करत दोन्ही बाजूंनी वाहने आडवी लावली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक मंद झाली. या चक्रव्यूहात आरोपींची गाडी हेरून तिला अधिकाऱ्यांनी घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कारमधून बाहेर येण्याच्या सूचना दिल्या. मात्र, आरोपींनी येण्यास नकार दिला. आरोपी शस्त्रसज्ज असल्याने पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत एके-४७ रायफलने कारच्या काचा फोडत आरोपींवर पिस्तूल रोखल्या. त्यामुळे आरोपींना प्रतिकाराची कुठलीही संधी मिळाली नाही व पोलीस पथकाने सहा जणांच्या मुसक्या आवळत ऑपरेशन यशस्वी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
Next Post

कारची हुलकावणी, दुचाकी उड्डाणपुलावरून कोसळून पती ठार, पत्नी गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंदराव नन्नवरे यांचा राजीनामा ; ना. पाटील यांचे मानले आभार !

June 6, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ७ ऑगस्ट २०२३ !

August 7, 2023

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार १८ नोव्हेंबर २०२२ !

November 18, 2022

शिवसेनेच्या ऊर्दू कॅलेंडरवर बाळासाहेबांचा ‘जनाब’ उल्लेख; भाजपची टीका

January 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group