नंदुरबार (प्रतिनिधी) निवडणूकीचा काळ असतांना सोशल मिडीयाच्या व्हॉटस अॅपवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या राज्यात विधानसभा निवडणूकीचे अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तथापि काही उपद्रवी समाजकंटकांकडून समाजातील शांतता भंग होण्यासाठी छुपे प्रयत्न सुरू असतात. यादरम्यान, एका व्हॉट्सअॅप ग्रुपवरील एका मोबाईल आगामी क्रमांक धारकाने विधानसभा निवडणूकीचे अनुषंगाने मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करुन दोन समाजात तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होईल, असा व्हिडीओ पोस्ट केल्याने सदर व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मोबाईल क्रमांकधारक निलेश चौधरी (रा. शांती नगर, नंदुरबार) याचेविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील सध्या करित आहेत.
पोलिस अधिक्षक श्रवण दत्त एस. यांनी म्हटले आहे की, नागरिकांनी आगाम निवडणुका तसेच सण उत्सवा दोन धर्मात तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होईल अशी कोणतीही अनुचित पोस्ट व्हिडीओ, गैरसमज पसरवू नये आपले पोस्ट, वक्तव्यामुळ कुठल्याही धर्माची अथव समाजाची भावना दुखावणा नाही, याची प्रत्येकाने खबरदार घ्यावी.
तसेच नागरिकांनी जिल्हया कायदा व सुव्यवस्था अबाधिन राहण्यासाठी पोलीस प्रशासनाम सहकार्य करावे. नंदुरबा सायबर सेल अशा प्रकारच सोशल मिडियावर गैरसमज अफवा पसरविण्याऱ्यांवर विशे लक्ष ठेवून आहेत. नागरिकांन सोशल मीडियावर आक्षेपाल स्टेटस, पोस्ट दिसून आल्यास त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याच आवाहन करण्यात आल आहे.