कॅनबेरा (वृत्तसंस्था) सध्या एका वयस्कर कपलची लव्ह स्टोरी चर्चेत आहे (Love Story Of Elderly Couple). ८० वर्षांच्या आजोबा ८४ वर्षीय आजीच्या प्रेमात इतके वेडे झाले की त्यांनी जे केलं ते पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
ऑस्ट्रेलियात राहणारे ८० वर्षांचे राल्फ गिब्स (Ralph Gibbs), त्यांची गर्लफ्रेंड कॅरोल लिस्ले (Carol Lisle) ८४ वर्षांची असून ती आजारी आहे. डिमेन्शिया आणि पार्किंसन्शी ती झुंज देते आहे. स्मरणशक्तीवर परिणाम करणारे हे आजार, ज्यामुळे कॅरोलची स्मृती कमजोर झाली आहे. ती काही वेळातच गोष्टी विसरते. स्वतःहून ती चालूही शकत नव्हती. तिला कुणाच्या तरी मदतीची गरज लागतेच. त्यामुळे ती पर्थ शहराती एका नर्सिंग होममध्ये आहे, जिथं तिच्यावर उपचार सुरू आहेत.
पण राल्फला तिच्यापासूनचा हा दुरावा सहन झाला नाही. ४ जानेवारी २०२२ ला तो तिला भेटायला आला आणि आपल्यासोबत पळवून घेऊन गेला. तिच्यासोबत तो ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या शहरात फिरला. पर्थपासून ४८०० किलोमीटर दूर क्विसलँडला जात होता. एका वाळवंटी प्रदेशात पोलिसांनी त्या दोघांनीही पकडलं. ४३ डिग्री तापमान असलेल्या या भागात ते गाडी चालवताना सापडले. कॅरोल खूप घाबरलेल्या होत्या. तिथूनच त्यांना एअरलिफ्ट करून पर्थला पुन्हा पाठवण्यात आलं.
राल्फवर कॅरोलचं आयुष्य धोक्यात टाकण्यासोबत बरेच आरोप लावण्यात आले. कोर्टात सुनावणीदरम्यान आपण जे काही केलं ते प्रेमासाठी केलं. १५ वर्षांपासून आपली जोडीदार राहिलेल्या कॅरोलसोबत आयुष्याची शेवटची काही वर्षे घालवायची आहेत. असं त्याने सांगितलं. कोर्टाने त्याची बाजू ऐकून घेतली आणि त्याला ७ महिन्याची जेल आणि २ वर्षांचा रेस्ट्रेनिंगचे आदेश दिले.
खरंतर अशा आजारी जोडीदारासोबत राहणं अनेकांना आवडत नाही. किती तरी लोक कंटाळून स्वतःहूनच अशा जोडीदाराला सोडतात पण राल्फला मात्र अशाच जोडीदाराची साथ हवी होती. त्यामुळे कॅरोलसोबत काही क्षण घालवण्यासाठी त्याने नियम, कायदे आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांची पर्वा केली नाही.