जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १२२३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ९०८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज तेरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – २४८, जळगाव ग्रामीण-१३, भुसावळ- १३५, अमळनेर-१५३, चोपडा-३३८, पाचोरा-०३, भडगाव-३०, धरणगाव-३१, यावल-४५, एरंडोल-२९, जामनेर-६५, रावेर-१९, पारोळा-३४, चाळीसगाव-२३, मुक्ताईनगर-२९, बोदवड-२७, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण १२२३ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ८० हजार ७८६ पर्यंत पोहचली असून ६८ हजार ९८१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज तेरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १५२६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १०२७९ रुग्ण सध्या उपचार घेताय.