जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९९४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ७१९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – २५०, जळगाव ग्रामीण-५७, भुसावळ- २२२, अमळनेर-११, चोपडा-१६०, पाचोरा-१५, भडगाव-६२, धरणगाव-६६, यावल-३२, एरंडोल-०१, जामनेर-१९, रावेर-००, पारोळा-५१, चाळीसगाव-४५, मुक्ताईनगर-००, बोदवड-०३, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ९९४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ७७ हजार ३८० पर्यंत पोहचली असून ६६ हजार १८९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १४९० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९७०१ रुग्ण सध्या उपचार घेताय.