जळगाव (प्रतिनिधी) इन्शरन्समध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवत विद्यूत कॉलनी परिसरात राहणाऱ्या ८८ वर्षीय वृध्दाकडून तब्बल ६१ लाख ७९ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, शहरातील आविद्यूत कॉलनी परिसरात ८८ वृध्द व्यक्ती हे आपल्या कुटुंबियासह राहतात. नोव्हेंबर २०१७ मध्ये त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर दिपीका शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने संपर्क साधला. त्यांच्या संपर्क साधून स्टार हेल्थ अॅण्ड अलाईड इन्सूरन्स कंपनी लिमीटेड कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. स्टार हेल्थ इन्सूरन्स कंपनीचे नाव व लोगो असलेले बनावट कागदपत्रे तयार करून खरे असल्याचे भासविले. स्टार हेल्थ कंपनी इंन्शरन्स कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखविले. संपर्कातील दिपीका शर्मा, अनुराग शर्मा आणि कमलाकरण रेड्डी असे नावे सांगणाऱ्या व्यक्तींनी वृध्द व्यक्तींकडून वेळावेळी पैश्यांची मागणी करत सुमारे ६१ लाख ७९ हजार ५९३ रूपयांचा ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी वृध्द व्यक्तीच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.