जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिलखेडा शिवारातील शेतात तहसीलदारांच्या आदेशानुसार रस्ता बनत असल्याचा कारणावरून एका वृद्ध महिलेला 6 जणांनी अश्लील शिवीगाळ करत हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवारी शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री 9 जळगाव तालुका पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ल.
निर्मलाबाई शांताराम कोळी (वय-60 रा. बिलखेडा तालुका जळगाव) या वृद्ध महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे पिलखेडा शिवारातील शेत गट क्रमांक 33 मध्ये शेत आहे. या शेतात जळगाव तहसीलदार यांच्या आदेशानुसार वृद्ध महिला शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या शेतात जेसीबीच्या मदतीने रस्ता बनवीत असताना त्यांच्या शेताच्या बाजूला शेत असलेले एकनाथ शिवराम चौधरी, सुधाकर सिताराम चौधरी, कुणाल सुधाकर चौधरी, महेंद्र प्रभाकर चौधरी, जितेंद्र प्रभाकर चौधरी, अतुल एकनाथ चौधरी (सर्व राहणार पिलखेडा ता. जळगाव) यांनी वृध्द महिलेला अश्लील शिवीगाळ करत हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केली.
या घटनेबाबत निर्मलाबाई कोळी यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रात्री 9 वाजता मारहाण करणारे एकनाथ शिवराम चौधरी, सुधाकर सिताराम चौधरी, कुणाल सुधाकर चौधरी, महेंद्र प्रभाकर चौधरी, जितेंद्र प्रभाकर चौधरी आणि अतुल एकनाथ चौधरी सर्व रा. पिलखेडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण अगोणे हे करत आहे.