जळगाव (प्रतिनिधी) ऑलिम्पिक जागरण समिती व इकरा एच.जे. थीम महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ऑलिम्पिक जागरण एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा यशस्वी संपन्न झाली.
या कार्यक्रमाची प्रस्तावना कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांनी त्याच्यां मनोगतात कार्यक्रमाची रूपरेखा सविस्तरपणे मांडली. तसेच कार्यक्रमाची व्याप्ती ही वाढत जात असुन जनजागृती ही अशीच कायम ठेवण्याचे समिती प्रयन्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी टोकओ जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत निरीक्षक म्हणून गेलेले अशोक दुधारे यांनी खास उपस्थित राहून आयोजन समिती व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्याची गरज असल्याची सांगून आयोजकांचे कौतुक केले. याप्रसंगी व्ही एस नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी. व्ही. दलाल यांनी सदर कार्यशाळा मिशन २०२४ ऑलिम्पिक समोर ठेवुन नवोदित खेळाडूंनी प्रेरणा देण्याकरिता ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तसेच जास्तीत जास्त महाविद्यालयाने असे कार्यक्रम आयोजित करावे. सदर कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून डॉ. अब्दुल करीम सालार यांनी त्यांच्या मनोगतात खेळाडूंना शोधुन त्यांना चांगल्या प्रशिक्षणाची सोय करून पुढे नेण्याचा प्रयत्न करायला हवा, आपल्या देशात खुप प्रतिभाशाली खेळाडू आहे. त्यांची शोध घेण्याची गरज आहे. इकरा एस जे थीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सयेद सुजाअत अली यांनीही मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाला लाभलेले मुख्य मार्गदर्शक प्रा डॉ. उदय डोंगरे, महाराष्ट्र शिवछत्रपती अवार्ड प्राप्त यांनी ऑलिम्पिक खेळाचा इतिहास, त्याची व्याप्ती व आधुनिक ऑलिम्पिक वाटचाल यावर सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच तलवारबाजी ह्या खेळाचा इतिहास व त्याचा होणारा प्रसार व प्रचार याबाबत माहीती दिली व पुढील ऑलिम्पिकसाठी जास्त खेळाडू सहभागी करण्याचा प्रयन्न संघटनेच्यावतीने सुरू आहे, अशी माहीती त्यांनी दिली.
सदर कार्यक्रमाला नुतन मराठा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ एन. जे. पाटील जळगाव हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ऑनलाइन पद्धतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रभरातून खेळाडू, क्रीडा शिक्षक, शारीरिक शिक्षण संचालक, प्राचार्य, प्राध्यापक व पालक आदी क्रीडाप्रेमींनी या व्याख्यान मालेला मोठा प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. चाँद खान, तसेच आभार प्रदर्शन प्रा. उमेश पाटील यांनी केले. प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय प्रा. सुभाष वानखेडे यांनी केला. ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. दिनेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच ऑलिम्पिक जागरण समिती, इकरा एस जे थीम महाविदयालय, जळगाव, व्ही एस नाईक महाविद्यालय रावेर व नुतन मराठा महाविद्यालय जळगाव कार्यशाळेला संबंधित असलेले सर्वांनी परिश्रम घेतले.