जळगाव (प्रतिनिधी) आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांचे शुभ हस्ते प्रतिमेस सर्वप्रथम माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिले जळगाव जिल्हाध्यक्ष स्व. विश्वनाथभाऊ इंगळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय. एस. महाजन व मिनाक्षीताई चव्हाण यांनी मौलान अबुल कलाम आझाद यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील केलेल्या भरीव अशा कामाचा आढावा घेऊन सखोल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, सेवादल जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, अल्पसंख्यांक महानगरअध्यक्ष डॉ. रिजवान खाटीक, मिडीया प्रमुख सलीम इनामदार, कार्यालयीन सचिव संजय चव्हाण, नगसेवक अशोकभाऊ लाडवंजारी, नगरसेवक सुनिल माळी, दिलीप माहेश्वरी, जॉन बी.अॅन्थोनी, जयप्रकाश महाडीक, अरविंद बंगाली, जावेद शकील बागवान, राजु तडवी, राजु बाविस्कर, सचिन चव्हाण, ममताताई तडवी, पिनाद फहनीबंदा, उज्वलाताई पाटील, लताताई पाटील, जुलेखा शहा आदी उपस्थित होते.