भुसावळ (प्रतिनिधी) येथील शहीद भगतसिंग फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्ताने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोरोना सदृश्य परिस्थिती लक्षात घेता फाउंडेशनतर्फे योग्य ती काळजी घेऊन जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शहीद भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश रायपुरे, जळगाव जिल्हा कॉंग्रेस कमेटी अनुसूचित जाती जमाती विभाग जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, मायक्रो व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल, रावेरचे प्राचार्य जीवन सपकाळे यांची उपस्थिती होती.