जळगाव (प्रतिनिधी) कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वी पणे करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. त्यांनतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील १२ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती.
या बाबत मंत्री लोढा म्हणाले “औद्योगिक संस्थांचे नामकरण हा केवळ एक निर्णय नसून, महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या संस्थांना आदर्श नेतृत्वांच्या नावाने ओळख मिळाल्याने या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण व प्रेरणा मिळेल. युवकांचा कौशल्यविकास हे राज्याच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे, आणि या नावांमुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आपल्या कार्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल. हा उपक्रम नव्या पिढीला त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी प्रेरणा देईल आणि त्यांच्या मेहनतीला एक दिशा देईल.”
नामकरण केलेल्या संस्थांची माहीती पुढील प्रमाणे
१. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव, ता. जळगाव, जि. जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव, ता. जळगाव, जि. जळगाव
२. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) जळगाव, जि. जळगाव – राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) जळगाव, जि. जळगाव
३. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव- क्रांतिकारी खाज्याजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव
४. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आदिवासी आश्रमशाळा), जोंधनखेडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव – संत मुक्ताबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आदिवासी आश्रमशाळा), जोंधनखेडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव
५. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमळनेर, ता. अमळनेर, जि. जळगाव- संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमळनेर, ता. अमळनेर, जि. जळगाव
६. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उचंडे, ता. मुक्ताईनगर , जि. जळगाव- चांगदेव महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उचंडे, ता. मुक्ताईनगर , जि. जळगाव
७. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आदिवासी), चोपडा, ता. चोपडा, जि. जळगाव- तंट्या मामा भिल्ल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आदिवासी), चोपडा, ता. चोपडा, जि. जळगाव
८. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चाळीसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव- भास्कराचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चाळीसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव
९. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भडगाव, ता. भडगाव, जि. जळगाव- महर्षी भृगु शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भडगाव, ता. भडगाव, जि. जळगाव
१०. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आदिवासी), यावल, ता. यावल, जि. जळगाव- महर्षी व्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आदिवासी), यावल, ता. यावल, जि. जळगाव
११. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रावेर, ता. रावेर, जि. जळगाव- स्वातंत्र्यसैनिक गोविंदराव वैद्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रावेर, ता. रावेर, जि. जळगाव
१२. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव- सिताराम भाई बिर्ला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव