चाळीसगाव (प्रतिनिधी) गणेशोत्सवानिमित्त चाळीसगाव वासियांसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून एकदंत भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे सहावे वर्ष असून या सांस्कृतिक महोत्सवामध्ये नृत्य गायन किर्तन अध्यात्म प्रबोधन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून MH 52 चाळीसगावचा एकदंत भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आजपासून (दि. 7 सप्टेंबर) आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे यंदाचे हे सहावे वर्ष असून गणेशोत्सव निमित्त चाळीसगाव वासियांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीचा आनंद घेता येणार आहे. तसेच सांस्कृतिक महोत्सवाला भेट देणाऱ्या सर्व महिला भाविकांसाठी विशेष 100 बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ देखील आहे.
असा असेल दहा दिवसांचा कार्यक्रम
शनिवार दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी संध्या. ५ वाजेपासून श्री गणेश चतुर्थी दिवशी भव्य आगमन मिरवणूक असणार आहे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण हे दिल्ली येथील सुप्रसिद्ध हनुमान की झांकी यास सटाणा येथील देव मामलेदार बँड तसेच 41+ ढोल पथकांचा समावेश आहे. या मिरवणुकीचा मार्ग खरजाई नाका अभिनव शाळा भडगाव रोड कॅप्टन कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान असे असणार आहे.
रविवार दि.८ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजता
आजच्या तरूणाईच्या हटके स्टाईलने अभंग, भजनं, भारूडं आदींचं सादरकरण करणारा सुप्रसिद्ध म्युझिक बॅन्ड, ‘अभंग रिपोस्ट’
सोमवार दि.९ सप्टेंबर २०२४ रोजी वेळ – रात्री ८ वाजता अजिंक्य म्युझिकल ग्रुप भायखळा यांची “संगीतमय बँजो व गरबा नाईट” चा आनंद चाळीसगाव वासियांना घेता येणार आहे.
तसेच मंगळवार दि. १० सप्टेंबर २०२४ रोजी रात्री आठ वाजता विशेष आकर्षण असणार आहे. महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम “महाराष्ट्राची हास्ययात्रा” याचा चाळीसगाव वासियांना हास्य आनंद घेता येणार आहे. या हास्य जत्रेचे सहभागी हास्यविर समीर चौगुले, चेतना भट, गौरव मोरे, वनिता खरात, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, शामसुंदर राजपूत, सावत्या, हेमंत व संच.
बुधवार दि.११ सप्टेंबर २०२४ रोजी वेळ – रात्री ८ वा. उब्रच कराड येथील प्रेरणादायी वक्ते प्रा डॉ विनोद बाबर यांचे यशाच्या शिवमंत्र या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
गुरुवार दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी वेळ – रात्री ८ वाजता कानुबाई फ्रेंड्स सर्कल गृप शिरपूर – धुळे – पुणे (गोल्डन बँण्ड शिरपूर) यांचा “कानुबाई गीतांचा कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवार दि.१३ सप्टेंबर २०२४ रोजी वेळ – रात्री – ८ वा वारकरी भूषण, सुप्रसिद्ध किर्तनकार, गायनसम्राट ह.भ.प.विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर) यांचे हरी कीर्तनाचा लाभ चाळीसगावकरांना घेता येणार आहे.
शनिवार दि. १४ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी – ८ वाजता. चाळीसगाव शहरात प्रथमच मराठी हिंदी गीतांची संगीत मैफिल म्हणजेच “Live in Concert” चे आयोजित करण्यात आले आहे. या मैफिलीत केतकी माटेगावकर, राहुल सक्सेना, सावनी रविंद्र, सौरभ दफ्तरदार हे राहतील.
रविवार दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजता झी मराठी, सोनी मराठी, कलर्स मराठी व झी युवा संगीत सम्राट फेमयुवा शाहीर रामानंद उगले यांचा “महाराष्ट्राची लोकगाणी”, पोवाडे व लोकगीतांचा कार्यक्रम असणार आहे
सोमवार दि.१६ सप्टेंबर २०२४ वेळ ८ वाजता. मन गाव… मना देस… लयभारी खान्देश.. खान्देशी अहिराणी सुपरस्टार्स यांचा “खान्देशी धमाका” आयोजित करण्यात आला असून यात सचिन कुमावत, पुष्पा ठाकूर, सिंगर भैय्या मोरे, विनोद कुमावत, त्रिशा पवार, मेघा मुसळे, रवी खैरे, शशी कचवे, श्रावणी मोरे, प्रशांत देसले, हितेन शिवडे हे असतील. तर मंगळवार दि. १७ सप्टेंबर २० श्री गणेश विसर्जन मिरवणूक आणि भव्य लकी ड्रा सोडत होईल. सर्व भाविकांनी सांस्कृतिक महोत्सवाला सहकुटुंब उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी व शिवनेरी फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.














