धरणगाव (प्रतिनिधी) येथील चौधरी टेन्ट हाऊसच्या बाजूला तेलाठी गल्ली येथे दिनांक 28 ऑगस्ट पासून कथा प्रारंभ झालेली आहे. दि 3 सप्टेंबर (रविवार) रोजी कथेची सांगता होणार आहे. रात्री 8.00 ते 10.30 या वेळेत 7 दिवशीय भव्य संगीतमय शिव महापुरान कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यात शिव पुराण कथा प्रवक्ते हभप भागवताचार्य श्री मेघनाथ महाराज ठाकरे (धरणगावकर) तसेच गायनाचार्य ह भ प शंभू महाराज चव्हाण, दयाराम महाराज तबलावादक प्रकाश महाराज अहिरे, ऑर्गन वादक कैलास महाराज तसेच वेशभूषाकार हभप सुधीर महाराज, यश ठाकरे यांचा सहभाग असणार आहे. तसेच या कथेसाठी पंचक्रोशीतील जास्तीत जास्त शिवभक्त व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक श्रीशक्ती नारीशक्ती महिला मंडळ व शिवभक्त धरणगाव शहराच्या वतीने करण्यात आलेले आहे.