बोदवड (प्रतिनिधी) येथील जि. प. उर्दू मुलींची शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील व त्यांच्या पत्नी यामिनी पाटील यांनी शाळेतील शिक्षकांचा सत्कार केला.
शिक्षक दिनानिमित्त शाळेच्या व्यवस्थापनाची धुरा सांभाळणाऱ्या हुमेरा वसीम खान मुख्याधिपिका, आलिया एजाज पर्यवेक्षक, तर शिक्षिका म्हणून अकसा तहेरीम शेख अकिल,शिज कौसर सै. लुकमान, अकसा कौसर सै. इमरान, ऐमन अमीन पटेल, आएशा सिद्धीका हाकीम पिंजारी,रेशमा नईम बागवान, बुशरा रहीम बागवान, रौशन जहाँ अमीर मणियार, या विद्यार्थिनींचा सत्कार करत बक्षीस देऊन कौतुक केले. तर मुख्याध्यापक मोहम्मद ईकबाल फयाजोद्दीन शिक्षक वृंद सादिक अहमद सगीर अहमद, मिर्झा न्यामतूल्ला बैदुल्ला बेग,नजमाबी मेहबूब शाह, आसिफ खान रफिक खान, जाविद शाह हसन शाह, मझहर मियाँ मुखतार मियाँ, सै. जैनुल आबेदीन सै. रियाजोद्दीन ,मदहद फुरहान सै. शहाबोद्दीन ,इफत सुलताना खाजा सफिरोद्दीन. यांचा आमदार व त्यांच्या पत्नी यांनी सत्कार केला.
यावेळी नगराध्यक्ष आनंदा पाटील ,नगरसेवक सईद बागवान, राजेश नानवाणी, नगरसेविका मनीषा बडगुजर, मीरा माळी, बेबीबाई माळी,शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा उपप्रमुख कलीम शेख,तालुका संघटक शांताराम कोळी, शहर प्रमुख राहुल शर्मा,गोलू बरडीया, हर्षल बडगुजर, आतिष सारवान, तौसिफ पिंजारी, हाजी रहीम बागवान, लियाकत कुरेशी,मुस्तकीम शेख, शकिर पटवे, भास्कर गुरचळ, सुभाष देवकर, धनराज गंगतिरे,देवेंद्र खेवलकर, निलेश माळी, गोपाळ सोनवणे हे मान्यवर उपस्थित होते.