जळगाव (प्रतिनिधी) भारताचे आद्य उर्दू कवी हजरत मोहम्मद इक्बाल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण विश्वात जागतिक उर्दू दिन म्हणून साजरा केला जात असतो. या दिनाचे औचित्य साधून मुस्लिम मनियार बिरादरीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवज ठाकरे यांना जळगाव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ४ मागण्याचे निवेदन दिले.
निवेदनात नोव्हेंबर २०१९ पासून उर्दू साहित्य अकादमीचे तसेच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे गठन करण्यात आले नसून ते त्वरित गठित करण्यात यावे, एमपीएससी परीक्षेत उर्दू भाषेला प्राधान्य देण्यात यावे, महाराष्ट्रात प्रादेशिक भाषा मराठी नंतर उर्दू भाषेला दुय्यम स्थान देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. वास्तविक पाहता उर्दू साहित्य अकॅडमीची स्थापना उर्दू भाषेचा प्रचार व प्रसारासाठी करण्यात आली असून तीच अकादमी दोन वर्षापासून गठित करण्यात आलेले नाही. त्यामुळे उर्दू भाषिकांची न भरून निघणारे नुकसान होत आहे, अशी खंत फारूक शेख यांनी तहसीलदार पंकज लोखंडे यांच्याकडे व्यक्त केली.
सदर निवेदनाची प्रत अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री डॉ. विश्वनाथ कदम यांना सुद्धा देण्यात आलेली आहे. सदर निवेदन मनियार बिरादरीचे अब्दुल रउफ, हमीद शेख, सलीम शेख, अख्तर शेख, अफरोज सैयद व फारूक शेख यांच्या हस्ते महसूल तहसीलदार पंकज लोखंडे यांना देण्यात आले.
निवेदनावर यांच्या होत्या स्वाक्षऱ्या
फारुक शेख अब्दुल्ला, सय्यद चाँद अमीर, शेख हमीद कालू, सलीम शेख यासीन, अब्दुल रऊफ रहीम, अख्तर शेख नियमातूल्लाह, ताहेर शेख इब्राहिम, सलीम शेख, मोहम्मद हारून शेख मेहबूब, जहीर शेख हमीद, अब्दुल रौफ शेख दाऊद, तय्यब इब्राहीम, जफर शेख, जावेद, शहेबाज शेख, अमरुल्लाह सय्यद, शेख सादिक रज्जाक, शेख अलीम रझ्झाक शेख यांची उपस्थी होती.