जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क येथे आरीफ खान रशीद खान (वय – ३३) या तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना रविवारी रात्री घडली. तसेच याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिवाजीनगर उस्मानिया पार्क येथे राहणारे आरीफ खान रशीद खान खासगी वाहनावर तो चालक म्हणुन कार्यरत होता. अनेक दिवसांपासून हाताला काम नसल्याने आरीफ तणावात होता असे नातेवाईकांनी सांगीतले. दरम्यान, दुपारी पती पत्नीत वाद झाला होता, हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले होते. यानंतर आरिफ याने गळफास घेतला. आरीफ यास रात्री दहा वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तपासणीत मयत घोषीत केले. आरीफखान यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व आई-वडील असा परिवार आहे.