धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात एकाने आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार आज सकाळी ) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील श्रीनाथ फर्निचरच्या बाजूच्या दुकानाच्या बाहेर एकाने मध्य रात्री दीड वाजेच्या सुमारास छताच्या अॅगलला शॉलने गळफास घेऊन आत्महत्या केली. या व्यक्तीचे नाव मनोज लक्ष्मीनारायण दायमा (वय ५३ रा. नाशिक, मूळ रा. शहादा) असल्याचे कळते. तसेच मयताने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने आपल्या मृत्यू बाबत मित्राला कळवावे म्हणून मोबाईल नंबर लिहून ठेवला होता. मयताचे नातेवाईक पोलीस स्थानकात पोहचले होते.
दायमा हे काही दिवसापासून तणावात होते, अशीही माहिती समोर आली आहे. शेवतेचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, दायमा हे धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथे एका आश्रम शाळेशी कामासाठी आले असल्याचेही कळते.