पारोळा (प्रतिनिधी) येथील भडगाव रस्त्यावरील वाघरे फाट्याजवळ सोयगावहून धुळे जाणाऱ्या बसला माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोने धडक दिली. या अपघातात दुर्दैवाने टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर बस चालक, वाहकासह ३८ प्रवासी जखमी झाल्याची घटना २० रोजी दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
पारोळा ते भडगाव रस्त्यावरील वाघरे फाट्यानजीक सोयगावहून धुळे येथे जाणारी बस (एमएच १४, बीटी- १९८४) व पारोळ्याकडून भडगावकडे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पो (एमएच- १९, सीवाय-१६०६) यांच्या २० रोजी दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास समोरासमोर जबर धडक झाली. यात पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे येथील टेम्पो चालक पंकज नथ्थू पाटील यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर या अपघातात ४० जण जखमी झाले आहेत. यात सोयगाव येथील मीराबाई पंढरी सोनवणे (वय ५५), तर सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील शांताबाई भावलाल राठोड (६५), भावलाल भोपा राठोड (६५), कृष्णा अरुण राठोड (३), धुळ्यातील यशवंत नगरमधील नीलाबाई घनश्याम मिरसागर (वय ७५), नफिसा बी युसूफ शहा फकीर (४०), अजमल युसूफ शहा फकीर (९), शंकर वनजी पाटील (६८), धुळ्याच्या लालबाग नगरमधील रुबीना पिरण खाटीक (३७), हनुमंतखेडे येथील संजनाबाई रघुनाथ पाटील (७०), अमळनेर तालुक्यातील धार येथील गोपाल दयाराम पाटील (५०), भडगाव येथील मनोहर साजन पाटील (६६), रमेश बुधो चौधरी (७५), जाकिया बी शेख रहमुद्दीन (६२), तर भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील गणपत रामसिंग पाटील (७०), ढेकूच्या मीराबाई रघुनाथ सोनवणे (८०), रघुनाथ गणपत सोनवणे (८०), धुळे येथील जानव्ही संतोष मोरे (१९), धुळ्यातील नगावबारी येथील सलीमा सिकंदर पिंजारी (६०), झेंडा चौकातील प्रेमसिंग नवलसिंग राऊत (धुळे), उंदीरखेडे येथील पंकज पाटील (३०), पाचोरा तालुक्यातील शीतल सागर राजपूत (३०), आराध्या सागर राजपूत (८), पांडुरंग महादू पाटील (७२), जैबूनसा शेख नाबी (६५), रुकसाना शेख अकिल (४५), सिल्लोड तालुक्यातील शकुंतला प्रकाश चव्हाण (५५), टिटवी येथील कमलबाई विश्राम पाटील (६०), सुमनबाई साईदास पवार (५०), धुळे जिल्ह्यातील साक्री येथील शुभांगी प्रवीण पाटील (३०), शहादा तालुक्यातील अलका विनोद चव्हाण (२५), शहदा येथील किंजल विनोद चव्हाण (३), डेव्हिड विनोद चव्हाण (२), नाशिक येथील पिंपळगाव येथील रोहित वाल्मीक राठोड (१९), नुर्जा शेख अब्बू (७५) हे जखमी झाले आहेत. तर या अपघातात शेंदुर्णी येथील बस चालक विनोद लक्ष्मण पाटील यांच्यासह एक जण गंभीर जखमी असल्याने त्यांना धुळे येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, अपघात घडतात प्रवाशांनी मोठा आरडाओरडा केला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मयत टेम्पो चालक पंकज पाटील यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
जखमींना यांनी तत्काळ केली मदत
अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे रुग्णवाहिकेचे चालक आशुतोष शेलार व यश ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने पारोळा येथील कुटील रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर डॉ. प्रशांत रनाळे, डॉ. सुनील पारोचे, डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. जिनेंद्र पाटील, डॉ. गणेश पोळे, प्रतिमा मोराडी, पंकज पाटील, सिस्टर प्रतिमा मुराडी, सेविका मंगलाबाई त्रिवाणे, शोभा बोरसे, भूषण पाटील, विशाल गोयर, महेश होंगह आदींनी उपचार केलेत.