TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन इरिगेशन कंपनीला प्रतिष्ठेचा स्मार्ट बनाना फार्म टेक प्रमोशन पुरस्कार

vijay waghmare by vijay waghmare
August 21, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

जळगाव/ तिरुचिरापल्ली 21 प्रतिनिधी – नवनवीन तंत्रज्ञान कृषीक्षेत्रात विकसीत करून संशोधनाच्या क्षेत्रात दैदीप्यमान काम केलेल्या व शेतक-यांच्या जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. या कंपनीला आज भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रातर्फे अत्यंत प्रतिष्ठित व मानाचा समजला जाणारा ‘स्मार्ट बनाना फार्म टेक प्रमोशन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथे २१ ऑगस्ट १९९३ रोजी राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. आज संस्थेचा ३२ वा स्थापना दिन होता. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्व्हराजन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट बंगलोरचे संचालक तुषार कांती बेहरा यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंपनीच्या वतीने कंपनीच्या केळी विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील आणि टिश्यूकल्चर विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी पुरस्काराचा स्वीकार केला. पुरस्कारात मानपत्र आणि सन्मानचिन्ह यांचा समावेश आहे. पुरस्कार वितरण समारंभाला कोईमतूर येथील ‘इंडियन इन्स्टिटयूट ऑफ शुगरकेन रिसर्च’ संस्थेचे संचालक डॉ. पी. गोविंदराज, नॅशनल रिसर्च इन्स्टिटयूट ऑन इंटीग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचे संचालक डॉ. आर. थंगवेलू आणि तामिळनाडू आदिवासी विभागाचे संचालक श्री. एस. अण्णादुराई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्व्हराजन भाषणात म्हणाले, की अतिशय उत्तम गुणवत्तेची, दर्जेदार व रोगमुक्त रोपे जैन इरिगेशन कंपनीने टिश्युकल्चर तंत्राद्वारे निर्माण करून केळी उत्पादनाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे. कंपनीच्या मूलभूत व पायाभूत संशोधन कार्यामुळे देशाचा केळी निर्यातीच्या क्षेत्रात जगभर नावलौकिक झाला आहे. कंपनीचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांनी खानदेशातील व महाराष्ट्रातील केळींची परदेशात निर्यात व्हावी असे स्वप्न जे पाहिले होते ते जैन कंपनीच्या अथक परिश्रम व कार्यामुळे पूर्णत्वाला जाऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धीची पहाट फुलली आहे. त्यामुळेच निवड समितीने जैन इरिगेशनची पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.
“जैन इरिगेशन कंपनी उत्पादित करीत असलेल्या केळी रोपांसह ठिबक सिंचन, पीव्हीसी व एचडीपीई पाईप आणि अन्य सर्व साहित्यावर अतोनात विश्वास व श्रद्धा ठेवून मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांचा हा सन्मान असून त्यांना आम्ही हा पुरस्कार आदरपूर्वक समर्पित करतो,” असे डॉ. के.बी. पाटील आणि डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJain Irrigation Company wins prestigious Smart Banana Farm Tech Promotion Award

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 22 ऑगस्ट 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एखादा मोठा नेता देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो, तर यात चुकीचे काहीच नाही : संजय राऊत

March 29, 2021

जैन इरिगेशनच्या पार्किंगमधून मोटारसायकल चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

April 2, 2022

इकराच्या महारक्तदान शिबिरात ५१ युनिट रक्त संकलन

July 15, 2021

चर्चा तर होणारच ! राज ठाकरे घेणार राज्यपालांची भेट

October 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group