धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव ते एरंडोल रस्त्यावरील हिरा इंग्लिश मिडीअम शाळेजवळ एका भरधाव वाहनाने मोटारसायकलला मागून दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सुभाष प्रल्हाद भोई (वय ३८ रा. बहादपूर नाका, अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १६ एप्रिल २०२२ रोजी एका अज्ञात इसमाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून किशोर वामन भोई (वय ४० रा. शुक्ला डेअरीजवळ जळगाव) यांच्या मोटर सायकलीस मागून धडक दिली. या धडकेत किशोर भोई यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.काँ संतोष एकनाथ थोरात हे करीत आहेत.