धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव रोडवरील बिजासनी जिनिंगच्या बाहेरून अज्ञात चोरट्यांनी एकाची दुचाकी लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मोहम्मद युसुफ अब्दुल मुनाफ (वय-५१ वर्ष रा. पाताल नगरी) हे दि. १६ मे रोजी रात्री १० ते ११ च्या दरम्यान, लग्नात हजेरी लावण्यासाठी बिजासनी जिनिंग येथे गेलेले होते. यावेळी त्यांनी आपल्या मालकीची हिरो होंडा फॅशन प्रो. कंपनीची लाल काळ्या कलरची मोटर सायकल क्रमांक (MH-१९- AY- ७०८२) जिनिंगच्या बाहेर लावलेली होती. यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने ही दुचाकी लांबवली. दरम्यान, सर्वत्र शोध घेतल्यानंतरही दुचाकी मिळून न आल्यामुळे अखेर मोहम्मद युसुफ यांनी दि. २७ मे रोजी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला. पुढील तपास स.फौ. रामदास पावरा हे करीत आहेत.