धरणगाव (प्रतिनिधी) येथील एकशे सहा वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकोत्तरी पी.आर. हायस्कूल मध्ये आज भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान पूजनाचा कार्यक्रम झाला. संस्थेचे संचालक अजय पगारीया आणि मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते संविधान आणि अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीचे पुजन करण्यात आले.
बालभारती अभ्यास मंडळ सदस्य बापू शिरसाठ यांनी संविधानाची माहिती देऊन संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून भारताच्या जडणघडणीत संविधानाची महत्वपूर्ण भूमिका आणि लोकशाहीत नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक कैलास वाघ यांनी केले तर आभार शिक्षक बी.सी.कोळी यांनी मानले.याप्रसंगी उपमुख्याध्यापक आर.के.सपकाळे पर्यवेक्षिका आशा चंद्रकांत शिरसाठ, राजेश खैरे, रामचंद्र धनगर, जितेंद्र बोरसे, विजय दाभाडे, निरज शिंदे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या नियोजना साठी जितेंद्र दाभाडे, राजेंद्र पवार, योगेश नाईक, नितीन बडगुजर, मिलिंद हिंगोणेकर यांनी सहकार्य केले. यानिमित्ताने शाळेच्या विद्यार्थ्यांनी आॅनलाईन संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. शाळेतर्फ विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात आले त्यात १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे संयोजन डॉ. वैशाली गालापूरे, गणेशसिंह सूर्यवंशी आणि संजय बेलदार यांनी केले.