भडगाव (प्रतिनिधी) येथील एका तरुणाच्या आईची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्डचा पासवर्ड चोरून तब्बल ७ लाख १९ हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात नयन आननसिंग गढरी (वय १९ रा. पिंपरखेड ता. भडगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २४ जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२२ दरम्यान अज्ञात व्यक्तीने आईचे नावे असलेले बॅक ऑफ बडोदा अकाउंट क्र १९३६८१००००४७८६ शाखा पिंपरखेडच्या शाखेतील अकाउंटमधुन वेळोवेळी बॅकेचे एटीएम कार्ड फसवणुक करण्याच्या उद्देशाने अप्रामाणिकपणे व लबाडीने बदलुन व एटीएम कार्डचा पासवर्ड चोरुन अकाउंटमधुन तब्बल ७ लाख १९ हजार रुपये काढुन फसवणुक केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि किसनराव नजनपाटील हे करीत आहेत.