जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका तरुणाला फेसबुकवर तरुणीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून अश्लील व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेलिंग करणाऱ्या एका अज्ञात व्यक्ती विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेमुळे शहरासह जिल्हाभरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, गणेश कॉलनी येथील प्रशांत नाना बाविस्कर (वय-३१) यांना त्यांच्या फेसबुक पेजवर निशा शर्मा नावाच्या फेसबुक पेजवरून ११ फेब्रुवारी रोजी ११ वाजता फ्रेन्ड रिक्वेस्ट आली. आणि प्रशात बाविस्कर यांनी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. त्यानंतर त्या पेजवरून स्क्रिनवर एका आक्षेपार्ह विडिओ पाठविला होता. तो व्हिडीओ प्रशांत हे पाहत असल्याचे भासविल्याचा व्हिडीओ पाठविला होता. वरील बनावट अकाऊंटच्या मोबाईल नंबरवरून प्रशांत बाविस्कर यांच्या व्हॉटसॲपवर पाठविला. दरम्यान या व्हिडीओत आपण असल्याचे भासवून प्रशांत यांच्याकडून खंडणी मागितली. घाबरून प्रशांत बाविस्कर यांनी संबंधित अनोळखी व्यक्तीच्या पे-फोनवर ७ हजार ४९९ रूपये ऑनलाईन पाठविले. दरम्यान आपली फसवणूक होत असल्याने प्रशांत बाविस्कर यांनी याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे करीत आहे.
















