जळगाव (प्रतिनिधी) मराठी प्रतिष्ठानच्या प्रयत्नाने शहरात ५ महिला पिंक ऑटो चालवत आहे व उत्तम प्रवासी वाहतूक सेवा देत आहेत. विशेष करून महिला प्रवासी वर्गात महिला ऑटो चालक मालक यांचे कौतुक होत असून पिंक ऑटोमध्ये प्रवास करण्याला महिला वर्ग प्राधान्य देत आहेत.
पिंक ऑटो सुरू करण्यात परिवहन विभाग, जळगाव, महावीर ज्वेलर्स, खूशाल ऑटोमोबाईल, यांचे विशेष सहकार्य लाभले आहेत. शहर वाहतूक विभाग, पोलीस विभाग यांचे पण सहकार्य पिंक ऑटो भगिनी यांना आहे. मराठी प्रतिष्ठानच्या कार्यालयात पिंक ऑटो बाबत सातत्याने महिला चौकशी करीत आहेत. प्रतिष्ठान च्या वार्षिक बैठकीत याबाबत निर्णय झाला असून शहरात आणखी १० महिलांना प्रशिक्षण देऊन सहकार्य करण्यात येणार आहे. पिंक ऑटो या रिक्षा व्यवसायात ज्या महिलांना आवड असेल अशा गरजू महिलांनी मराठी प्रतिष्ठान च्या गणपती नगर कार्यालयात कागदपत्रासह भेटावे असे आवाहन मराठी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अँड. जमील देशपांडे व सचिव विजय वाणी यांनी केले आहे.