नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शेतकर्यांशी संबंधित नवीन कायद्यांना विरोधी पक्ष कडाडून विरोध करत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना सटकवले आहे. कृषी विधेयकवरून निषेध करणारे लोक यंत्र मशीन व उपकरणे पेटवून शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. कारण, शेतकरी शेतीशी संबंधित साधनांची पूजा करतात, अशी टीका मोदींनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नमामी गंगे मिशन उत्तराखंडच्या 6 मेगा प्रोजेक्ट लॉन्च करण्याच्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, ‘ते लोक अनेक वर्षांपासून म्हणत होते की, न्यूनतम समर्थन मूल्य(MSP)लागू करतील, मात्र त्यांनी केले नाही. आता आमच्या सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार एमएसपी लागू केले. तर आता काही लोक विरोध करत आहेत, कारण त्यांच्या काळ्या कमाईचे साधन आता नष्ट झाले आहे.’ पंतप्रधान म्हणाले की, गेल्या आठवड्यात संपलेल्या संसद अधिवेशनात शेतकरी, कामगार आणि आरोग्याशी संबंधित बर्याच सुधारणा करण्यात आल्या. शेतकरी आता आपले पीक कोठेही आणि कोणासही विकू शकतात. केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांचा हक्क देत आहे, तेव्हा काही लोक निषेध करत आहेत. अशा लोकांना वाटत नाही की, शेतकऱ्यांनी आपली उत्पादने खुल्या बाजारात विकावीत. त्यांना वाटते की, मध्यस्थांना फायदा होत राहावा. अशा प्रकारे ते शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याला विरोध करत आहेत.