बोदवड (प्रतिनिधी) बोदवड येथे महाराष्ट्र शासन आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन एक जून रोजी अग्रसेन भवन येथे सकाळी ११ ते २ पर्यंत केले आहे.
तहसील कार्यालय, महिला व बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात शासनाच्या सर्व विभागाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी महिलांच्या तक्रारी असल्यास त्यांच्याकडून एक फॉर्म भरून घेतला जाणार असून तो संबधित विभागाकडे पाठवला जाणार आहे.
यावेळी विविध शासकीय विभागाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच शिबिरात महिलांच्या अधिकार व कायदे या विषयक माहिती देणारे स्टाँल असणार आहेत. याबाबत आवश्यक त्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असून तरी या शिबिरास जास्तीतजास्त महिलांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन सरंक्षण अधिकारी प्रतीक पाटील यांनी केले आहे.