धरणगाव (प्रतिनिधी) दि.3 जून 2023, शनिवार रोजी सायंकाळी स्व.लक्ष्मीचंद डेडिया सर अर्थात मास्टरजींना अर्पित स्वरांजलीने धरणगावकर रसिक भारावले.
श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात झालेल्या या भावपूर्ण कार्यक्रम त्यांच्या शिष्यवृन्दान्नी आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरवात दीप्रज्वलनाने करण्यात आली. व तिथे स्व. डेडिया सरांचे वाद्य तबला ठेवण्यात आला होता. स्व. डेडिया सरांच्या स्मृतीला उजाळा देण्यासोबतच व गावात युवा वर्गाला प्रेरणा मिळेल या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धरणगावतील जेष्ठ संगीत महर्षी श्री.रमेश बी. पाटील सर यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानिमित्त सरांना शाल,श्रीफळ व पांडुरंगाची प्रतिमा देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त प्रा. रमेश महाजन सर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या प्रसंगी मंचावर बी.एन.चौधरी सर,राहुल जैन,डॉ.मिलिंदजी डहाळे, अजित डहाळे, कांतीशेठ डेडिया, दुष्यंत जोशी सर व अनिल डेडिया उपस्थित होते. या स्वरांजली कार्यक्रमात चि. लोकेश वाघ, पूर्वा पाटील,पियुष डहाळे, प्रदीप झुंझारराव, श्रेया भावे, स्वाती भावे, नाना पवार, प्रा.अजित डहाळे, तनय डहाळे, हिमांशू जगताप, तेजल जगताप, यज्ञेश जेऊरकर, वीणा उदापुरकर (वर्धा), दुष्यंत जोशी, आर.बी.पाटील सर. या कलासाधकांनी आपली प्रस्तुती जबरदस्त दिली व प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
या कार्यक्रमात चि. तेजल सचिन जगताप व चि.यज्ञेश जेऊरकर यांनी जबरदस्त तबला वादन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. नुकतेच त्यांना अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे येथे 19 वी ऑल इंडिया तबला स्पर्धा आयोजित मध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. व त्यांची पुढील निवड थायलंड येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी झालेली आहे.
सदर कार्यक्रमासाठी रसिकांची उपस्थिती प्रेक्षणीय होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल जैन, श्रेयान्स जैन, राजेश डहाळे, पियूष डहाळे, प्रतीक जैन, निकेत जैन, नितीन जैन, विनोद जैन, सुयश डहाळे, प्रमोद जगताप व सचिन जगताप यांनी प्रयत्न केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जगताप व राहुल जैन यांनी केले व आभार प्रदर्शन पियुष डहाळे यांनी केले.