जळगाव (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व ऑलिम्पिक अवरनेस कमिटी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने फिट इंडिया मुव्हमेंट या विषयावर एक आठवड्याची कार्यशाळा आजपासून २ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत सकाळी ११ ते १ या दरम्यान Zoom ॲपव्दारे, यू ट्यूब लाइव्ह व फेसबुक लाइव्हव्दारे आयोजित करण्यात येत आहे.
या कार्यशाळेत मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी डॉ. अपर्णा अष्टपुत्रे-शिसोदे (औरंगाबाद) या स्पोर्टस सायकालॉजी, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सुयश बुरकूल (नाशिक) हे ट्रेनिंग ऑफ फिटनेस, ३० सप्टेंबर २०२१ रोजी डॉ. सचिन पाटील (बऱ्हाणपूर) हे योगा, एक ऑक्टोबर, २०२१ रोजी डॉ. अनिल करवंदे (नागपूर) हे फिजिओथेरपी, २ ऑक्टोबर, २०२१ रोजी संजय मिसर, डॉ. अजयपाल उपाध्याय, राजेश जाधव, डॉ. एस. एच. बेलोरकर डीबेट ऑन स्पोर्टसमध्ये सहभागी होतील. या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी लिंक, मिटींग आयडी आणि पासवर्ड खालीलप्रमाणे आहेत.
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/85418466888?pwd=MW1ubzFISHdGUnFZU2dvZkFNb25HQT09
Meeting ID: 854 1846 6888
Passcode: 123456