मुंबई (वृत्तसंस्था) भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देत शिवसेनेसह संजय राऊतांना (Sanjay Raut) डिवचलं आहे. आमचे तिसरे उमेदवार हे शिवसेनेच्या प्रथम क्रमांकाच्या उमेदवारापेक्षाही जास्त मतांनी विजयी झाले, असा टोला फडणवीसांनी लगावला.
विजयानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला मतदान करणाऱ्या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. हा विजय महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो. जे स्वतःला महाराष्ट्र, मुंबई समजतात. त्यांना या विजयाने लक्षात आणून दिले. महाराष्ट्र म्हणजे १२ कोटी जनता, मुंबई म्हणजे मुंबईतील जनता आणि मराठी म्हणजे आम्ही सगळे आहोत, हे दाखवून दिले आहे. विजयाची मालिका सुरू झाली आहे.’
“सगळ्यात महत्वाची गोष्टी अशी की आमचे जे तिसरे उमेदवार निवडून आले, त्यांनी शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा म्हणजे संजय राऊतांपेक्षाही जास्त मतं घेतलं आहे. आमचे पियुषजी 48 मतांनी निवडून आले, आमचे डॉ. बोंडे यांनाही तेवढीच मतं मिळाली. तर आमच्या धनंजय महाडिकांना 41 पाईंट 56 मतं मिळाली आहेत. जी शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त आहेत, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.















