जळगाव (प्रतिनिधी) तुमच्या मुलाला नौकरी लावून देतो, असे सांगून एकाने अडीच लाख आणि सोन्याचे दागिने उकळून पिडीत महिलेवर बलात्कारही केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीसात विनोद रामदास तायडे (रा. भुसावळ), याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १ मे २०२२ ते १ मे २०२३ या काळात विनोद तायडे याने पिडीत महिलेच्या मुलाला नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून पिडीतेकडून रोख २ लाख ५० हजार रुपये व १५ ग्रॅम वजनाचे दागिने घेतले. तसेच पिडीतेसोबत जवळीक साधली. यानंतर पिडीतेच्या मर्जीविरुद्ध वेळोवेळी शारीरीक संबंध करुन प्रस्थापित केले. तसेच तू जर कोणाला सांगितले तर तुझ्या ‘तु मुलाला नोकरी लावून देणार नाही’, अशी धमकी दिली. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पिडीतेने रामानंद पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास पोउनि गोपाल देशमुख हे करीत आहेत.