जामनेर (प्रतिनिधी) लाकूड वेचायला चल, असे सांगून अल्पवयीन मुलीवर जंगलासह आणि घरी वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या ४७ वर्षीय प्रौढाविरुध्द जामनेर पोलिसात सोमवारी रात्री बलात्कार व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार २० जुलै २०२२ रोजी ४ वाजेच्या सुमारास नन्हा नजाकत खान (४७, जामनेर) याने पिडीत मुलीला लाकूड वेचायला चल, असे सांगून जंगलात तिच्यावर अत्याचार केला. तसेच घटनेची वाच्यता केल्यास मारून टाकण्याची व आईला जंगलात फेकून देण्याची धमकी पीडितेला दिली होती. यानंतर पिडीतेची आई घरी नसल्याचा फायदा घेत संशयित आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. याबाबत पीडितेच्या आईने सोमवारी रात्री तक्रार दिल्याने खान याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२) (ज) (न) सह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि. दिलीप राठोड हे करीत आहेत.