जळगाव (प्रतिनिधी) जिह्यातील एका गावातील विवाहितेसह तरुणीबाबत फेसबुकवर अश्लिल मजकुर अज्ञात विकृताने प्रसारीत करून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पिडीत तक्रारदाराने म्हटले आहे की, दि. 5 ते 14 फेब्रुवारी दरम्यान कोणीतरी अज्ञात फेसबुक खातेधारकाने त्याचे गीता पाटील नाव असलेल्या प्रोफाईलवर त्यांची पत्नी आणि भाचीचा यांचा फोटो ठेवलेला होता. सदर खात्यावर अत्यंत घाणेरड्या भाषेत बदनामी कारक अश्लील मजकुर लिहिलेला आहे. तसेच फेसबुकवरील अश्लिल नाव असलेल्या एका ग्रुपवर देखील तसाच अश्लिल मजकूर पोस्ट केला. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीसात अज्ञात फेसबुक खाते धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि लिलाधर कानडे हे करीत आहेत.