नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाराणसीत ज्ञानवापी मशिदीच्या निकालावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ‘हे बाबरी मशिदीवरील डिसेंबर १९४९ च्या पाठ्यपुस्तकाची पुनरावृत्ती आहे. हा आदेश स्वतःच मशिदीचे धार्मिक स्वरूप बदलतो. हे १९९१ च्या कायद्याचे उल्लंघन आहे. मी भीती व्यक्त केली होती, ती खरी ठरली आहे, असं ते म्हणालेत.
ओवैसी यांनी ज्ञानवापीची तुलना बाबरी प्रकरणाशी केली आहे. त्यांनी ट्विट करुन प्रतिक्रीया दिली आहे. ‘हे बाबरी मशिदीवरील डिसेंबर १९४९ च्या पाठ्यपुस्तकाची पुनरावृत्ती आहे. हा आदेश स्वतःच मशिदीचे धार्मिक स्वरूप बदलतो. हे १९९१ च्या कायद्याचे उल्लंघन आहे. मी भीती व्यक्त केली होती, ती खरी ठरली आहे. ज्ञानवापी ही मशीद होती आणि मशीदीच राहील, असंही त्यांनी यात म्हटले आहे.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना ओवैसी म्हणाले, न्यायालयाचा आदेश संसदेने १९९१ मध्ये मंजूर केलेल्या कायद्याच्या विरोधात आहे. कारण आजच्या आदेशाने मशिदीचे स्वरूप बदलले आहे, जो कायदा बनवण्यात आला होता. कोणत्याही धार्मिक स्थळाचे स्वरूप बदलू नये. ओवेसी म्हणाले की, आजचा आदेश बाबरी मशीद-राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे उल्लंघन करत आहे.
‘उद्या सर्वोच्च न्यायालयात या विषयावर सुनावणी होणार आहे, तेव्हा एवढ्या लवकर अहवाल का सादर केला नाही, हे समजत नाही आणि तुम्ही न्यायालयात गेलात, तर परिसर सील करा, असा आदेशही देण्यात आला होता. ओवैसी म्हणाले की, बाबरी प्रकरणात मी श्रद्धेच्या आधारावर दिलेला निर्णय असल्याचे सांगितले होते आणि आता इतर मुद्दे उघडतील आणि ते उघडले आहेत. संघाच्या नेत्यांच्या संकेतस्थळांवर जा, ते म्हणतात की, एकेकाळी सर्व मंदिरे होती, आता तोच मुद्दा रोज उपस्थित होईल, असंही ओवैसा म्हणाले.