सोलापूर (वृत्तसंस्था) सोलापुरातील श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयात ऑक्सीजनच्या टाकीचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. शहरातील पूर्व भागात असणाऱ्या श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयात मध्यरात्री ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट झाला असून त्यात दोनजण ठार झाल्याची माहिती हॉस्पिटलचे अधिकारी डॉ. माणिक गुर्रम यांनी दिली आहे. या स्फोटात एक रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे.
यातील एक मृत सुनील लेंगारे हे पोस्ट कोव्हिड उपचारासाठी सोलापूरच्या मार्कंडेय सहकारी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांची प्रकृती आधीपासूनच खालावलेली होती त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या आईला डबा देण्यासाठी आलेले हनुमंत शिरसागर यांचा देखील या घटनेदरम्यान मृत्यू झाला. स्फोटाच्या वेळी हनुमंत शिरसागर हे आपल्या आईला डबा देऊन रुग्णालय परिसरामध्ये बसले होते. त्यावेळी ऑक्सिजन त्यांचा स्फोट झाल्याने त्यांना मानसिक धक्का बसला. बेशुद्ध अवस्थेत त्यांना यास रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूस प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईक मदन क्षीरसागर यांनी केला. तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. दरम्यान मृत हनूमंत शिरसागर यांच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया रुग्णालयाचे चेअरमन डॉ. माणिक गुर्रम यांनी दिली.